रस्त्याची परिस्थिती झालीयं बेकार , नागरिकांचा पुलावरून सतत जीवघेणं प्रवास.
दै.चालू वार्ता.
प्रतिनिधी, समाधान कृष्णा कळम
वडोद तांगडा
भोकरदन, तालुक्यातील वडोद तांगडा येथिल वडोद तांगडा ते जळकी ,हिसोडा मार्गे भोकरदन सिल्लोड जाणारा हा रस्ता आहेत. गेल्या 25 वर्षेंपासून या रस्त्याकडे संबंधित बांधकाम विभाग ,तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधीचे या रस्त्याकडे दुर्लक्ष आहेत.
सदरील नागरिकांच्या माहिती नुसार सांगण्यात येते की या रस्त्याची उदघाटन समारंभ अनेक वेळा झालेला आहेत. मागील दोन वर्षे झालेयं फक्त रस्ता मोजणीसाठी शासकीय कर्मचारी येताय रस्त्याची मोठ्या प्रमाणात मोजणी करून जाताय ,नेमकं या रस्त्याचा निधी कोणाच्या घस्यात आडकलाय,
नेमकं, गावातील पुढारी लोकांच्या ,की प्रतिनिधी व बांधकाम विभाग कंत्राटदारांच्या हाच प्रश्न गावातील शेतकरी तसेच तरुण मुलांना पडलायं.
गेल्या दोन वर्षात कोरोनाशी संघर्ष करावा लागत होता ,आता शेतकऱ्यांना या रस्त्यावरून व पुलावरून येण्याजाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहेत.
वडोद तांगडा या गावात शेतकरी मिरची उत्पादन मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. परंतु दुर्दैवी शेतकऱ्यांना मिरची मालाला कधी भाव भेटतो किंवा नाही भेटतो ,मिरचीचं ट्रक्टर ,बैलगाडी तसेच दुध उत्पादक शेतकर्यांना दुध मोटारसायकल वरून घरी व बाजारात रस्त्यावरून नेणं देखील कठीण झाले आहेत.
वडोद तांगडा ते जळकी रस्त्यावरील पुलाला अंदाजे 40 ते 50 वर्षे पूर्ण झाले असेल ,सदरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावर पावसाच्या पाण्याने वाहून आलेला कचरा या पुलात अडकून या पुलावरून रस्ता ओलाडंने कठीण झाले आहे. त्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वहाता प्रवाह लाटा पाऊस पडल्यानंतर होत आहेत.तसेच त्या वहात्या पाण्यातून नागरिकांना जीवघेणं प्रवास सहन करावा लागतो .पुलावर पाण्याचा वहाता प्रवाह असल्यास कधीकधी सुलतान पुरा कडील वस्तीवर रहाणार्या नागरिकांना माताभगिनींना दुःखाच्या काळात दवाखान्यात येण्याजाण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिखल तुडवत व पाणी वहात असल्यास तिथेच रस्त्यावर बसून पुलावरील पाणी कमी होईपर्यंत त्रास सहन करावा लागत आहे.
सदरील प्रशासनाने या पुलाची लवकरच दखल घ्यावी .अशी गावातील नागरिकांची विनंती करण्यात येत आहेत.
