लोकप्रतिनिधी मात्र आपल्या वासांच्या भविष्यासाठी धडपड.
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: गेल्या काही दिवसांपासून @9 पंतप्रधान मोदीच्या ९ वर्षाच्या कार्याचे लेका झोका जनतेच्या दारापर्यंत काही कार्यकर्ते पोहोचवण्याचे काम करत आहेत पण ते स्वतःच्याच मतदारसंघातील विकासाच्या कामाकडे दुर्लक्ष करून मोदी साहेबांच्या नावावर आपली पोळी भाजून घेण्याचं काम करीत आहे .1991 पासून नांदेड जिल्ह्यावर काँग्रेसचे वर्चस्व असून पण देगलूर – उदगीर रस्ता पाहता , आल्यास आजतागायत लातूर जिल्हा हद्द सुरू झाला की रस्ता चांगलाच असतो आणि फक्त नांदेड जिल्हा हद्दीतील रस्ताच नेहमीच खराब असतो. विविध पक्षातील कार्यकर्ते आपल्या नेत्यांना लोकप्रिय,नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते,विकासपुरुष असे विविध विशेषणे देऊन सोशल मीडिया तसेच बॅनर वर नामोल्लेख करतात. ते अतिशय चुकीचे आहे.आपल्या जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था जर पाहिली तर लक्षात येईल की आपल्या जिल्ह्याचे भाग्यविधाते कोणीही नाही. कोणालाही आपल्या जिल्ह्यातील रस्ते किंवा इतर कामे चांगल्या दर्जाचे व्हावेत असे वाटतच नसावे.
देगलूर ते उदगीर आणि देगलूर ते हनेगाव या रस्त्याची नेहमीच दुरावस्था. हे नेहमीचेच. कोणालाही निवडून द्या प्रत्येकजण काम चांगल्या दर्जाचे कसे होईल यापेक्षा त्यातून स्वतःला किती टक्केवारी मिळेल यातच त्यांना स्वारस्य असते.
या लोकप्रतिनिधींना सामान्य जनतेचे काहीच देणेघेणे नाही हे अनेकदा सिद्ध झाले आहे.
तसेच देगलूर- एकलारा – हिब्बट – मुखेड हा रस्ता मागील दोन वर्षापासून लटकलेले आहे.त्याकडे या लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष घातले तर तो प्रश्न सहज सुटू शकतो.पण त्यात त्यांना स्वारस्य नाही.
देगलूर हून मुखेड जाण्यासाठी देगलूर ते नरसी मुखेड जात आहेत.
आणि देगलूर ते नांदेड रस्त्याची अवस्था ही तशीच झाली आहे.
नांदेड – बीदर साठी उस्मान नगर मार्ग केलेला रस्ता जास्तीचा कोणाच्या फायद्याचे आहे हे चाणाक्ष जनता जाणून आहे.आजही तो रस्ता अपूर्ण आहे. आणि नांदेड – बीदर साठी आजही देगलूर हून गाड्या जात आहेत.
ही झाली काही मुख्य रस्त्याची अवस्था. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रस्त्याची अवस्था तर विचारूच नका. या अंतर्गत रस्त्याची निर्मिती नुसती कागदावरच होते. आणि त्याची माहिती बहुतांश वेळी भोळ्या जनतेला नसतेच.
जर रस्ते चांगले झाले तर दळणवळण चांगले होईल. सध्याला अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे पारंपारिक शेतीमधील पिकापेक्षा ऊस लागवडीमुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल देगलूर बिलोली तालुक्यातील शेती ही ऊस पिकासाठी उत्तम असून पण या स्वार्थी राजकारणामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये एक पण उत्तम असा उसाचा कारखाना शिल्लक राहिला नाही जेणेकरून त्या साखर कारखान्याच्या भरोशावर शेतकरी आपल्या शेतात ऊस लागवड करेल व आपलं उत्पन्न वाढू शकेल असे झाले तर शेतकरी सदन होईल व लोकांच्या विकासाची गती वाढेल आणि असे झाले तर लोक आपापल्या कामात मग्न होतील.आणि असे झाले तर राजकीय पक्षांना कार्यकर्ते मिळणार नाहीत ही भीती. म्हणून या भीतीपोटी विकास कामे करायचे नाही असा अर्थ घ्यावा लागेल. तसेच हेच कारण असावे लेंडी प्रोजेक्ट वेळेवर न करण्याची. आता या स्वार्थी राजकारणामुळे तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कोणत्या पक्षाचा प्रचार करावा आणि कोण्या पक्षाचा झेंडा हाती घ्यावा यामध्येच परेशान . अशा या खुर्चीच्या लालची राजकारणांना येणाऱ्या लोकसभा व विधानसभेमध्ये यांची जागा दाखवण्याची खरंच वेळ आलेली आहे…
