देगलूर शहरातील महिलांच्या सुरक्षा ऐरणीवर….
देगलूर:देगलूर शहरात वाहन चोरीचा धुमाकुळ सुरू असतानाच त्यापाठोपाठ महिलांचे दागिने चोरणारे चोरटे सक्रिय झाले आहे का?दि 06. जुलै.2023 रोजी वेळ 12.30 वा. सुमारास रेणुका बसवराज शेटकार 39 वर्षे व्यवसाय घरकाम राहणार शिवनेरी नगर रामपूर रोड देगलूर यांनी सकाळी साईबाबा मंदिरामध्ये दर्शनाला गेले असता परत येते वेळेस शारदानगर देगलूर येथील बंडू कुरे यांच्या घरासमोर एका मोटर सायकल स्वाराने रेणुका बसवराज शेटकार यांच्या पाठीमागून येवून त्यांच्या गळ्यातले चार तोळ्याचे गंठण हिसकावून घेऊन पसार झाला त्या महिलेने आरडाओरड केला पण बाजूला कोणतीच व्यक्ती नसल्यामुळे तो चोरटा त्या ठिकाणाहून पसार झाला.
त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अहिराणीवर आला आहे का?
तत्पूर्वी फिर्यादीने पोलीस स्टेशन येथे जाऊन अनोळखी व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार नोंद केली. फिर्यादी याच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण किंमत अंदाजे 1,75,000 रुपयाचे चालत्या गाडीवरून हिसकावून घेऊन पळून गेला असे फिर्यादीवरून सांगण्याहून देगलूर पोलीस स्टेशन येथे अनोळखी व्यक्तीच्या विरोध गुन्हा कलम 392 नोंद करण्यात आला .
देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक मुंडे यांच्या आदेशाने पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेडेकर यांच्याकडे देण्यात आला.
पुन्हा एकदा देगलूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा च्या संदर्भामध्ये देगलूर नगरपालिका व पोलीस प्रशासन निष्फळ असल्याचे दिसून येत आहे देगलूर शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेरा पैकी २० टक्के कॅमेरे चालू स्थितीमध्ये असून बाकी कॅमेरे अनेक दिवसापासून बंद अवस्थेत असून आशा चोरीच्या तपासासाठी सीसीटीव्ही कॅमेरे हे मोलाची कामगिरी बजावतात तरीपण पोलीस प्रशासन जाणून बुजून या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसून येत आहे यामुळे देगलूर शहरांमध्ये मोटरसायकल चोरणे महिलांच्या गळ्यातली चैन चोरणे या बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरांना कुठेतरी खतपाणी दिल्यासारखं वाटत आहे. अशा या विषयाकडे देगलूर शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी लक्ष घालत असताना दिसून येत नाहीत फक्त जनता त्यांना मतदानाच्या काळामध्ये आठवते बाकीच्या दिवशी जनतेचे प्रश्न जनता सोडवावी लोकप्रतिनिधी मात्र आपल्याच कामांमध्ये गर्क असताना दिसतात अशा या लोकप्रतिनिधींना जनतेने येणाऱ्या काळात त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.यासाठी देगलूर शरीरामध्ये अशा घटना पुन्हा घडूने यासाठी प्रशासने लवकरात लवकर पावले उचलून देगलूर शहरातील नागरिक कशी सुरक्षित राहतील याकडे लक्ष दिले पाहिजे.
