
व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी केली मागणी.
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:नांदेड जिल्ह्यासाठी
१०० नवीन एसटी बसेस देण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व जिल्हा संघटन मंत्री गंगाधरराव जोशी यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे.
संचालक शेखर चन्ने यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यासाठी १०० नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले अशी माहिती गोजेगावकर यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील एसटी बसची अवस्था खूप दयनीय झाली असून अनेक बसेस ना दुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. नांदेड आगारात नवीन व चांगल्या एसटी बसेसची संख्या अपुरी असल्याने अनेक मार्गावर जुन्याबसेस पाठवाव्या लागतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हाभरात “गाव तिथे एसटी’ तसेच प्रत्येक खेड्यातील विद्यार्थ्यांना शाळेला ये-जा करण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करणे गरजेचे असून शाळकरी मुलांचा व महिलांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नांदेड जिल्ह्याला नवीन बसेस मिळणे खूप गरजेचे आहे. ग्रामीण भागात सध्या धावत असलेल्या महामंडळाच्या मोडकळीस आलेल्या बसेस मध्ये बसण्यास प्रवाशी तयार होत नसून त्यांनी अनेकवेळा रोष वक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिल्याने महिलांचा एसटीबसने प्रवास करण्याकडे कल वाढला आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत व ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास सुरू केल्याने एसटीतून प्रवास करण्याकडे ज्येष्ठ नागरिक व महिलांचा मोठा ओढा वाढला आहे. असे असले तरीमोडकळीस आलेल्या एसटी बसेस मधून प्रवास करताना वैतागलेल्या महिलांनी नांदेड जिल्ह्यासाठी नवीन बसेस देण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय टाळावी व त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व जिल्हा संघटन मंत्री गंगाधरराव जोशी यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन नांदेड जिल्ह्यासाठी १०० नवीन एसटी देण्यात याव्यात, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यासाठी १०० नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महिला व जेष्ठ नागरिकांची गैरसोय लवकरच दूर होईल असा विश्वास व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी दैनिक चालू वार्ता सी बोलताना व्यक्त केला…