गावात विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी पालकांचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर भोकरदन ठिय्या आंदोलन …
दै.चालू वार्ता.
प्रतिनिधी समाधान कृष्णा कळम
भोकरदन :
भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे तब्बल 247 पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिकवणीवर परिणाम होत असल्याने रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी बेमुदत ठिय्या आंदोलन गटशिक्षणाधिकारी कार्यालय भोकरदन येथे बळीराजा संघटनेचे अध्यक्ष श्री नारायन लोखंडे यांच्यावतीने करण्यात आली आहेत.
सदरील जागा रिक्त असल्याने जिल्हा परिषद शाळेचं भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने सर्वच रिक्त असलेले पदे भरण्यात यावे अशी मागणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनातून केली आहे.
दरम्यान ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे ,प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळाले पाहिजे सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु, शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. खासगी शाळेचं शिक्षण ग्रामिण भागातील पालकांना न परवडणारे आहे. त्यामुळे शासनाने रिक्त पदे भरण्याची मागणी बळीराज्या संघटनेचे अध्यक्ष नारायण लोखंडे यानी केली आहेत
आंदोलनात उपस्थितसदरील जागा रिक्त असल्याने जिल्हा परिषद शाळेचं भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने सर्वच रिक्त असलेले पदे भरण्यात यावे अशी मागणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनातून केली आहे.
जळगाव सपकाळ जिल्हा परिषद शाळेतील 5 शिक्षकांचे रिक्त पदे,राजूर – 3,चिंचोली निपोनि-3,केदारखेडा – 4,खडकी 3,कठोरा बाजार -5, बरंजळा साबळे 3,बरंजळा लोखंडे 2,
सिरसगाव वाघरूळ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे 4 पदे रिक्त आहे,
सिरसगाव मंडप जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे 3 पदे रिक्त आहे.
खंडाळा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे 3 पदे रिक्त आहे.समतानगर 3,वालसावनंगी उर्दू – 4,
फत्तेपूर जिल्हा परिषद शाळेतील 4 जागा रिक्त,
असे अनेक गावात एक दोन जागा रिक्त आहेतच,परंतु जिथे दोन पेक्षा जास्त जागा रिक्त आहे तेथीलच आकडेवारी नमूद केली आहेत
दरम्यान ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे ,प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळाले पाहिजे सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु, शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. खासगी शाळेचं शिक्षण ग्रामिण भागातील पालकांना न परवडणारे आहे. त्यामुळे शासनाने रिक्त पदे भरण्याची मागणी बळीराज्या संघटनेचे अध्यक्ष नारायण लोखंडे यानी केली आहेत
आंदोलनात उपस्थित
नारायण लोखंडे, शेख जफर,कृष्णा काळे, अनिल भुतेकर,अनिल साबळे,बोरसे गुरुजी,संदीप भोकरे,अशोक नागवे,नारायण मिसाळ आदी.