
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर तालुक्यातील आलूर या गावचे सामाजिक कार्यकर्ते अमृत सोपानराव पाटील यांची अखिल भारतीय शिव स्वराज सेना नांदेड जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे.तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेत मराठा बहुजन समाजातील कार्याची दखल घेत संघटना अध्यक्ष श्री कैलासराव पाटील यांच्या आदेशाने मा अमृत पाटील यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली व नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील सातेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्य सुरू राहील. या निवडी बद्दल सर्व मित्र परिवाराकडून व तसेच सर्वच स्तरातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.