
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर येथे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार,लोकनेते खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा देगलूर येथे घेणार जनता दरबार..
दिनांक १७ जुलै २०२३ सोमवार रोजी सकाळी ११:००वा.लोकनेते खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा जनता दरबार पंचायत समिती सभागृह, देगलुर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यावेळी देगलूर तालुक्यातील सर्व जनतेच्या समस्या व विकास कामाबद्दल आढावा बैठक घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लोकांच्या समस्या तात्काळ कशा सोडवता येईल याबद्दल व जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर येथे जनता दरबार घेण्यासाठी येणार आहेत.
तरीही देगलूर शहर आणि देगलूर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करण्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात कामानिमित्त अडचणी येत असतील तर आपण जनता दरबार येथे आपल्या समस्या घेऊन उपस्थित रहावे. असे आव्हान भारतीय जनता पार्टी देगलूर त्यांनी केले…