
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळूंके
सातारा-शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांने फिर्यादी प्रवासी सिकंदर जगन्नान पवार हे दिनांक ६ /०७ /२३ रोजी मुंबई ते इस्लामपूर बसने असा प्रवास करीत होते. सदरची बस संध्याकाळच्या सुमारांस सातारा बस स्थानकात जेवणासाठी थांबली असता फिर्यादी यांना हाताने व लाथा बुक्क्यांने मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी बोटातील सोन्यांची अंगठी मोबाईल व खिशातील रोख रक्कम असा ऐंवज जबरदस्तीने काढून घेतला होता. याप्रकरणी फिर्यादी प्रवासी सिकंदर जगन्नाथ पवार यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यांत फिर्याद दाखल केली होती. असा जबरी चोरीचा गुन्हा शाहुपुरी पोलीस ठाण्यांत दाखल होता. वरिष्ठांच्या आदेशावरुन सदरचा गुन्हा अवघ्या ६ तासांत शाहुपुरीच्या गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पथकांतील पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी उघडकीस आणला. यामध्ये आकाश इंगवले व ओयस खान त्यांचा साथीदार रफिक मुलाणी अशी संशयितांची नावे आहेत. या तिघांच्या पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत आधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपींच्या कब्जांतून चोरीस गेलेला सर्वच रोख रकमेंसह एकुण मुद्देमाल ३४०.२८० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेखर अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे,गुन्हे प्रकटीकरण विभागांचे सहा. प्रशांत बंधे सहा.पो.फौ.ए.ए.बागवन पो.हवा. सुरेश घोडके,पो.ना. निलेश,काटकर महेश बनकर अभय साबळे,पो. कॉ. सचिन पवार,स्वप्निल पवार,स्वप्निल,सावंत सुमित मोरे आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला…