
हनुमान मंदिराभोवती घाणीचे घोळ..!
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी उमापूर कृष्णा जाधव
बीड गेवराई उमापूर या गावात पावन हनुमान मंदिर असून,या मंदिराभोवती संपूर्ण घाणीचे साम्राज्य सासले असून,दररोज सकाळी येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असताते,या मंदिरा भोवती या घाणीमुळे दुर्गंधी पसरली असून,ही घाण लवकरात लवकर स्वच्छ करण्यात यावी असे नागरिकांतून सांगण्यात येत आहे.गावाचा तर विकास होणारच नाही असे वाटते..! हे माहीत असून,आता कमीत कमी मंदिरा भोवतीची घाण तरी स्वच्छ करून देण्यात यावि.
हे गाव सर्कल मध्ये सर्वात मोठे गाव असून या गावाची अशी अवस्था झाली.कि
या गावात चोहीकडे फक्त चिखल चिखल आणि तुंबलेल्या नाल्या आणि घाण,व गावातील बस स्टँडच्या भोवतीचौकडे फक्त घाणच घाण साचलेली असून,या गावाचा कोणी वाली नाही,कारण गेले कित्येक वर्ष या गावाचा विकासच नाही झाला,
या गावात पिण्याचं पाणी तर नाहीच,
पंचायतीचे नळ फक्त दाखवायलाच असून,चौकडे अशा घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून,पावसाळ्यात त्या घाणीतून दुर्गंधी पसरतो,ही दुर्गंधी व घाण लोकांच्या आरोग्यास हानिकारक असून,याची काहीतरी विल्हेवाट आता लावण्याची गरज असून आणखी ही या प्रकरणाकडे कोणाचे ही लक्ष न लागल्याने येथील नागरिक हायरान व त्रस्त झाले असून,या घाणीपासून उमापूर कधी मुक्त होईल याची वाट पाहत आहे.
गेले कित्येक वर्षापासून या गावाचे वाली कुणीच नसून,या गावात रस्त्याचे ही असेच हाल आहेत.गावातील एक ही रस्ता धडाचा नसून,या रस्त्यावरून पावसाळ्यात चालण्यासारखे काहीच नसल्याने नागरिक वैतागले आहे,
गाव चालवणाऱ्यांवर आता नागरिक
निराश होत आहेत,या गावात फक्त राजकारण राजकारण आणि राजकारणच घुसल्यामुळे या गावात विकास नावाचा शब्द ही उरलेला नाही.
या गावातील विकास कामांचे पंचनामे व्हावे,संबंधित अधिकाऱ्याने गावात येऊन पाहणी करावी,एवढे मोठे गाव असून या गावात हे काय चालले आहे हे कोणालाच काही माहित नाही.जास्त पाऊस झाला तर उमापूर मधील लेंडीला एवढा मोठा पूर येतो की याकडे चा माणूस त्या कडेला जाता येत नसल्याने उमापूरकर हैराण झाले आहे.सध्या तर एवढा पाऊस उमापूरला झाला नसून असे हाल आहेत,मोठ्या पावसात कशी परिस्थिती निर्माण होते ही उमापूरकरांनाच माहीत आहे.
उमापूर ग्रामपंचायत ने ही घाण हटवावी नाल्या मोकळ्या कराव्या
व सध्या तर खड्ड्यात मुरूम टाकावे
असे येथील जनतेतून मागणी होत आहे.