
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बीडअंबाजोगाई
अंबाजोगाई प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र नामदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे मानव विकास निवसी मतिमंद व मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.तसेच शहरातील बडा हनुमान मंदिर परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण , राजकिशोर मोदी,विलास सोनवणे, तानाजी देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य गोविंद देशमुख , शिवाजी सोमवंशी , सय्यद ताहेर हे उपस्थित होते.
याप्रसंगीबआलेल्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर पाहुण्यांचे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत स्वागत केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य गोविंद देशमुख यांनी सर्वप्रथम राज्याचे कृषी मंत्री ना धनंजय मुंडे यांना त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ना. धनंजय मुंडे यांच्या वाढ दिवसानिमित्त शाळेतील अपंग, मतिमंद व मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे वाटप तसेच येथील बडा हनुमान मंदिरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करणे म्हणजे मुंडे साहेवांच्या निरोगी दिर्घयुष्यासाठी निसर्गाकडे प्रार्थना करणेच होय अशी भावना देशमुख यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण यांनी देखील कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांना वाढदिवसप्रसंगी शुभेच्छा प्रगट करत विद्यार्थ्यांना फळांचे वाटप केले. अंबाजोगाई शहरातील प्राचीन असे बडा हनुमान मंदिर परिसरात शेंदूर, वड पिंपळ या प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण केल्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदतच होणार असून याचा मोठ्या प्रमाणावर मानवांना फायदाच होणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले. तसेच बडा हनुमान मंदिर हे शहरवासीयांचे एक पवित्र व प्राचीन धार्मिक स्थळ असल्याने या मंदिरात परिसर सुशोभीकरण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी स्पष्टोक्ती राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी दिली.