
दैनिक.चालू वार्ता
चाकूर तालुका प्रतिनिधी किशन वडारे
चाकूर तालुक्यातील चापोली येथील संजीवनी महाविद्यालयात राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर या नावाने मुलींना शिक्षणासाठी मोफत प्रवास या योजने अंतर्गत संजीवनी महाविद्यालय चापोली येथे महाविद्यालयातील मुलींना मोफत प्रवास पासचे वाटप करण्यात आले. यामुळे मुलींना लाभ मिळणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
समाजामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी मोठ्याप्रमावर जागृती केली जात आहे. मात्र परिस्थिमुळे आजही असे अनेक कुटुंब आहेत जे मुलींना इतर गावी पाठवून पुढील शिक्षण देण्यासाठी असमर्थ आहेत. शासनाकडून यावर अनेक उपाययोजना राबवल्याजात आहेत. त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने इयत्ता पहिली ते बारावीचे शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी अहिल्यादेवी होळकर मोफत एस टी पास नावाने योजना राबवली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी दुसऱ्या गावी प्रवास करणाऱ्या मुलींना मोठा लाभ मिळणार आहे व ज्या मुलींचे परिस्थिमुळे शिक्षण थांबले आहे ते आता आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करू शकतील.
चापोली आसपासच्या गावात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मागणीनुसार बसची सुविधा उपलब्ध करून दिली व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सतत सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्धल अहमदपूर आगाराचे वाहतूक नियंत्रक प्रमोद मठपती व चालक विश्वनाथ गंगापुरे यांचा विशेष सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय चाटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्था सचिव तथा चापोलीचे सरपंच उपप्राचार्य डॉ. भालचंद्र चाटे, प्रा. आर. डी. मोरे, प्रा. परमेश्वर डिगोळे सह आदी उपस्थित होते…