
दैनिक चालू वार्ता
बल्लारपूर प्रतिनिधी कमलेश नेवारे
बल्लारपूर: बल्लारपूर शहरातील प्र .क्र. ०१ व ०२ येथील डॉ राजेंद्र प्रसाद व पंडित दीनदयाल वॉर्ड या दोन्ही वार्डाच्या मधोमधी मोठा नाला आहे. पावसाळ्यामध्ये संततधार पावसाने हा नाला कचरा व दुर्गंधीने पुलावरून ओवरफ्लो वाहत जातो या पुलाला Returning Wall नसल्यामुळे तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो तसेच येथे दुर्घटना होण्याची तीव्र शक्यता आहे. तसेेच प्र .क्र .०२ डॉ राजेंद्र प्रसाद वार्ड व कन्नमवार वार्ड येथील काही नाल्याची चेंबर टुटलेेली व काहींना चेंबर सुध्दा नाहीत यामुळे येथे पण दुर्घटना होण्याची तीव्र शक्यता आहे. त्याची दखल घेत भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष मोहीत डंगोरे यांनी माननीय मुख्याधिकारी साहेब न. प. बल्लारपूर यांना निवेदन देऊन या विषयाचा गांभीर्य बघून लवकरात लवकर chambers दुरूस्ती व Returning wall बनवून देण्यात यावी ही विनंती केली या वेळी उपस्थित दर्शन मोरे, सुरज चौबे, लखन बानोत, धनसिंग पटेल, आकाश शर्मा, गोलू घुगरे आदि उपस्थित होते..!