
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा तालुक्यातील पांगरी हे गाव अध्यात्मिक क्षेत्रात सप्ताहाचा माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ख्यातनाम असुन या गावची माती ही श्री संत मोतिराम महाराज , किर्तनमहर्षी श्री संत ह भ प मारोतराव महाराज दस्तापुरकर , श्री ह भ प कोंडजीबापु महाराज डिग्रसकर , श्री ह भ प सोपान काका ईसादकर , श्री ह भ प माधव महाराज सोनमांजरीकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाली असुन संतांनी घालुन दिलेला वार्षिक अखंड हरीनाम सप्ताह असो अथवा अधिकमास मधील सप्ताह असो या दोन्ही सप्ताहाचे नियोजन सप्ताह संयोजन समिती व गांवकरी मंडळी पांगरीच्यावतीने भव्य दिव्य स्वरुपाचे करण्यात येते .
प्रतिवर्षी प्रमाणे येणाऱ्या अधिकमास सप्ताचे आयोजन अतिशय सुंदर प्रकारे पांगरी गावात करण्यात येते यावर्षी पण अतिशय सुंदर कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन करण्यात आले आहे यामध्ये पहाटे काकड आरती भजन , सकाळी १० ते ११ गाथाभजन , ४ ते ५ प्रवचन , ६ ते ७ हरिपाठ व संध्याकाळी ९ ते ११ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार मंडळींची किर्तन त्यामध्ये श्री ह भ प रामचंद्र महाराज सुकीकर , श्री ह भ प नामदेव महाराज रेंगे , श्री ह भ प बंडुदेव महाराज डिग्रसकर , श्री ह भ प आत्माराम महाराज रायवाडीकर , श्री ह भ प रमेश महाराज बुचाले , श्री ह भ प नवनाथ महाराज वसमतकर , श्री ह भ प कृष्णदास महाराज पांगरीकर यांचे सप्ताहतील सात दिवस राञी ९ ते ११ हरीकिर्तन होतील व दिनांक २५-०७-२०२३ मंगळवारी गुरूवर्य श्री ह भ प ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांचे काल्याचे किर्तन होईल. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायणाचार्य , मृदंगाचार्य , टाळकरी ,विणेकरी चोपदार यांची प्रमुख उपस्थिती आठ हि दिवस राहील.
अधिकमास मधील सर्वच किर्तनसेवेचा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान सप्ताह संयोजन समिती व समस्त गावकरी मंडळी पांगरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.