
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी किशोर फड बीड
बँकेच्या माध्यमातून हजारो गरजूवंतांना मदत होते हेच आमचे भाग्य :- संस्थापक अध्यक्ष श्री विक्रम (बप्पा) मुंडे..
केजच्या कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ची पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कारासाठी औरंगाबाद विभागातून निवड झाली असून शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबईतर्फे दिला जाणाऱ्या सन 2021 – 22 पद्मभूषण कै. वसंत दादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कारासाठी औरंगाबाद विभागातून शंभर कोटी च्या पुढे ठेवी असलेल्या गटात केजच्या कृष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ने प्रथम क्रमांक पटकावला असून बँकेला पद्मविभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष ‘श्री विश्वास जयदेव ठाकूर’ यांनी पत्राद्वारे कळवले आहे. त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की प्रत्येक नव्या युगाच्या उंबरठ्यावर सर्वोत्कृष्टतेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी भविष्याची नवी परिभाषा निर्माण करण्यासाठी आव्हानांचे सामर्थ्य असावे लागते आणि तेच सहकार्याच्या आधुनिकतेचे अहवान कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने यशस्वीपणे पेलेले आहे.
पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना बँकेचे चेअरमन श्री विजयकांत (भैय्या) मुंडे यांनी दैनिक चालु वार्ताशी बोलताना पुढे म्हणाले की मेहनत ,चिकाटी, दृढ संकल्प, शिस्तबद्धता आणि ध्येयावर नजर या यशस्वीतेचे सूत्र घेऊन आपल्या बँकेची वाटचाल नव्या आर्थिक परवाची गरज ठरली असून आपल्या बँकेच्या कामाचे गुणवत्ता आणि ग्राहक अभिमुकता या दोन गोष्टी बँकेचे शक्ती स्थळ आहेत. याच गुणावर बँकेची घौडदौड वेगाने सुरू असल्याने आपल्या बँकेला पद्मविभूषण कै. वसंत दादा पाटील उत्कृष्ट नागरिक सहकारी बँक पुरस्कार मिळाला आहे.
शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे वितरण होणार आहे दरम्यान कृष्णा अर्बण को-ऑपरेटिव बँकेला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बँकेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष श्री विक्रम (बाप्पा) मुंडे, चेअरमन श्री विजयकांत भैय्या मुंडे, उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, श्री अतुल दादा मुंडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव मुंडे व सर्व संचालक मंडळाचे सर्व स्तरातून व पंचक्रोशीतील परिसरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
बँकेतील सर्व खातेदारांच्या विश्वासार्हतेमुळेच हे यश :- श्री अतुल (दादा) मुंडे…