अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळूंके
धनगर पिपरी येथील स्मशान भूमी मध्ये वृक्षारोपण लागवड करण्यात आली यावेळेस प्रत्येक एक नागरिकांनी एक झाड ‘एक व्यक्ती , एक वृक्ष’ लागवड व संवर्धनाचा संकल्पाचे करण्यात आली आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविला. विषेश म्हणजे ,
तासभरा ऑक्सिजन विकत देणारे डॉक्टर आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडाला कदर केल्या जात नाहीत झाडे लावा जीवन वाचवा राज्य सरकारने 1 जुलै या दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला होता त्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावरील मेसेज येत आहे उकाडत्या पाण्याचे कमालीचे तापमान दुर्भिक्ष पावसाची अनिश्चिती या सर्वाला आपणच जबाबदार आहोत
वृक्षवल्ली आम्हा सोयरसोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून प्रत्येकांनी जर वृक्षरोपण करण्याबरोबरच वृक्षांचे योग्य पालनपोषण केले तर त्यांच्यापासून आपल्याला विविध गोष्टी प्राप्त होतात. ज्या भागांमध्ये वृक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्या भागातील परिसर हा स्वच्छ आणि निसर्गमय पाहायला मिळतो, असे मत सुनिल खाडेकर यानी व्यक्त करण्यात आले. वटवृक्षाचे संगोपन करुन पर्यावरण समतोल अबाधित ठेवून जपावी पशुपक्षी देखील वटवृक्ष असतील तर मानव जीवन सुखी होईल असा संदेश यावेळी देण्यात आला उपस्थित सुनील खांडेकर संजय आबा जाधव जनार्धन मुळे संतोष मोढेकर राजू माने भागीरथ खांडेकर प्रकाश ढवळे भानुदास मुळे ज्ञानेश्वर कदम कृष्णा पवार रामेश्वर आरगडे बबन जाधव बद्री बेंद्रे शिवाजी मुळे महेश आरगडे ज्ञानेश्वर साळुंके धर्मराज मुळे हनुमान खांडेकर काही गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
