
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे..
पुणे/इंदापूर: पुणे जिल्हा परिषद जिल्हा नियोजन मंडळातून इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील गारपीर – सावंत वस्ती रस्ता आणि गारपिट ते कानगुडे वस्ती रस्ता या १४ लक्ष कामाचा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व नीरा – भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विलास वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला झाला.यावेळी हनुमंत शिंदे आणि संजय शिंदे यांनी गावातील इतर कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली.
या रस्त्याची गेल्या अनेक वर्ष दुरावस्था झालेली होती. त्यातच पावसाळ्यामध्ये रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते, या रस्त्यावरती गाडी चालवणे तर दूरच पण पायी चालताना सुद्धा आजारी व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक यांचे फार हाल होत होते. ही बाब शेटफळ हवेली येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.तात्काळ या भागातील लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी हा रस्ता मंजूर करून आज या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला.
यावेळी चितरंजन पाटील, दादासाहेब घोगरे संचालक निरा भीमा सहकारी साखर कारखाना, स्वप्निल सावंत संचालक इंदापूर अर्बन सहकारी बँक, सिताराम जाधव सेवा निवृत्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तानाजी नाईक, विष्णू जाधव, माणिक बापू खाडे, ग्रामविकास अधिकारी शिंदे साहेब व शेटफळ हवेली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.