
कैलास येसगे कावळगावकर…
भारत राष्ट्र समितीचा (BRS) शासन व प्रशासनाला निवेदन…
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे….
देगलूर: दिनांक 22 जुलै 2023 रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी जंगम तहसिलदार राजाभाऊ कदम व कृषी अधिकारी यांची एकत्र भेट घेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना याच अधिवेशनात मदत जाहीर करून आश्वस्त करावे; लवकरात लवकर सरसकट मदत दिली जावी अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल याबाबतचे निवेदन दिले.
यावेळी भारत राष्ट्र समिती चे देगलूर-बिलोली प्रभारी सुरेशदादा गायकवाड, कैलास येसगे कावळगावकर, रमेश घुळेकर, श्याम वद्देवार, मारोती पाशमवार, गंगाधर आऊलवार, संदिप भूताळे, राहूल गायकवाड सह अनेक शेतकरी उपस्थित होते.