
काँग्रेसला मोठा धक्का…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बच्चू कडू यांची निवड झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळाला आहे.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बच्चू कडूंची तर उपाध्यक्ष पदी अभिजित ढेपे यांची निवड झाली.बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बच्चू कडूंची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला.संपूर्ण अमरावती शहरासह ग्रामीण भागात सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये प्रहारमय वातावरण यावेळी पाहायला मिळाले.तर शेतकऱ्यांना व संचालकांना उपोषणाला बसविणाऱ्या काँग्रेसला त्यांनी चितपट केले असे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.