
छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्यावतीने आंदोलनाचा इशारा – विजय पा चव्हाण…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड कडून लोह्यात प्रवेश करत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक लागतो या चौकातील गोलाईची प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे शिवप्रेमीत नाराजी दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर कंधार लातूर गंगाखेड नांदेड या ठिकाणच्या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक उभारला गेला आहे.
कधीकाळी या गोलाईत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे अनेक आंदोलन केली. ( कै.)भाई डॉ. केशवराव धोंडगे यांच्या आंदोलनाला राज्यभर प्रतिसाद मिळाला होता.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या गोलाईत छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास बंदी आणली.यंदाच्या शिवजयंतीला गोलाईच्या बाजूस अश्वारूढ छत्रपतींचा पुतळा उभारण्यात आला आहे. परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक गोलाई ची दुरावस्था झाली आसुन याकडे संबंधित बांधकाम विभाग साफ दुर्लक्ष करत असल्याने शिवप्रेमीत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक गोलाई चे डागडुजी करून देण्यात यावे. दिवाबत्ती कायम ठेवण्यात यावी. छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज मोठ्या स्तंभात उभारला जावा.लोहा पालिकेच्या माध्यमातून या गोलाईची आकार कमी करून आत गार्डन करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष द्यावे अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे…