
धानोरा मक्ता येथे शिक्षक सेनेच्या वतीने वृक्ष लागवड…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
वृक्ष लागवड करून वृक्षाचा वाढदिवस साजरा करणे हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते तथा पं.स. सदस्य नवनाथ ( बापु) रोहिदास चव्हाण यांनी लोहा तालुक्यातील मौजे धानोरा मक्ता येथील जि.प. प्रा.शाळेत शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेच्या वतीने आयोजित केलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमात केले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यात वृक्ष लागवड पंधरवडा साजरा होत असुन यात लोहा तालुक्यात या कार्यक्रमांने मोठी आघाडी घेतली आहे.
यात दि.२४जुलै रोजी लोहा तालुक्यातील मौजे धानोरा मक्ता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक सेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड कार्यक्रमांचे आयोजन राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांनी केले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा येथील शिवसेनेचे युवा नेते तथा पं.स. समिती सदस्य नवनाथ (बापु) रोहिदास चव्हाण होते तर प्रमुख उपस्थिती शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष संभाजी पवार, शिक्षक सेनेचे जिल्हा समन्वयक बालाजी भांगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील कदम , मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास सावळे, प्रेस संपादक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, छायाचित्रकार विनोद महाबळे, मु.अ. चव्हाण, व्यंकट वाघमारे, मोहन वाघमारे, मु.अ.अशोक कदम सर,सुभाष राठोड,ईरबा नागरगोजे सर,ज्ञानोबा केंद्रे,परमेश्वर तिडके सर,ज्ञानोबा होळगे सर व सौ.सुरेखा नरंगले मॅडम यांच्या सह शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नवनाथ (बापू) चव्हाण म्हणाले की, वृक्ष लावणे व त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे वृक्ष लागवड केल्यामुळे व पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. भूस्खलना सारख्या घटना टळतील झाडाची मुळ ही जमिनीत मातीला पकडून ठेवते . आपण भाग्यवान आहोत आपण शेतकऱ्यांची मुले आहोत आपल्याला झाडे लावायला शेत आहे घरासमोर अंगण आहे जागा. मुंबई पुणे येथील नागरिक, विद्यार्थी हे फ्लॅट मध्ये राहतात त्यांना झाडे ही कुंडी मध्ये लावायला लागतात असे नवनाथ (बापु)रोहिदास चव्हाण म्हणाले.
तसेच यावेळी शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण, जेष्ठ पत्रकार बापू गायखर, मु.अ. चव्हाण, यांचे ही भाषणे झाली.
तसेच यावेळी धानोरा मक्ता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात विविध झाडे जाळ्यासहित लावण्यात आले.