
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर;देगलूर शहरातील एका खाजगी इंग्रजी शाळेचे विद्यार्थी अक्षरशः मेढा रासारखी रिक्षात कोंबुन धोकादायक प्रवास करताना दिसून आले. विशेष म्हणजे यादरम्यान दुसऱ्या बाजूने पोलीसांची व्हॅन जात होती.
शहरातील जुना बस स्टॅन्ड मुख्य रस्त्यावरून गर्दीच्या वेळेमध्ये तीन चाकी ऑटो रिक्षातून एका इंग्रजी खाजगी शाळेचे विद्यार्थी खचाखच भरलेले जात होते. अनेक विद्यार्थ्यांचे पाय आणि त्यांचे दप्तर पाणी बॉटल ऑटो
रिक्षाच्या बाहेर लटकताना दिसत होते. जुना बसस्थानक येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूने अनेक वाहनांची वर्दळ होती. त्यामुळे धक्का लागून विद्यार्थ्यांचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली दिसून येत होती.
राज्य शासनाने शाळेत ने आन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांनी व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर असून सुद्धा त्याची कुठेही काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे एका ऑटो रिक्षामध्ये किती विद्यार्थी बसवावेत त्या ऑटोला वाहन परवाना आहे की नाही.त्याचा कुठेही काटेकोर पणे अमलबजावणा हाताना दिसत नाही. विशेष म्हणजे एका ऑटो रिक्षामध्ये किती विद्यार्थी बसवावेत याचेही नियम पायदळी तुडवलेले दिसून येत आहेत. याचा अर्थ शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे आहे का? असे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
दरम्यान याच प्रसंगी पोलिसांची गाडी याच ऑटो रिक्षाच्या दुसऱ्या साईडने जात होती. परंतु त्यांनी या रिक्षावाल्याला साधी हटकण्याचे औदार्य दाखविले नाही. यावरून पोलिसांचा विद्यार्थ्यांच्या प्रती असलेला निष्काळजीपणा दिसून येत आहे. पालकांनी आपला विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर घरी सुरक्षित येण्यासाठी संबंधित शाळांना भेट देऊन योग्य ती जबाबदारी पार पाडण्यासाठी भेटणे गरजेचे असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी खाजगी शाळानी ही काही ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.