
नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी 50,000/- रु. नुकसान भरपाई द्या…
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे….
देगलूर: दिनांक 20 जुलै रोजी देगलूर तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेला असून शेतकऱ्याचे पिकासोबत शेतातील माती खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर खूप मोठा संकट निर्माण झाले आहे त्यादरम्यान देगलूर तालुक्यातील उशिरा पावसामुळे शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडले असताना परत एकदा ढंग फुटीमुळे देगलूर तालुक्यातील सुगाव, सावरगाव- कारगा, शहापूर, मनरंगा वन्नाळी, अंतापूर चैनपुर, लख्खा या गावचे संपर्कच तुटले असून मरखेल, हणेगाव, खानापूर, माळेगाव, खुतमापूर, मुत्तनहिप्परगा आंबुलगा मरतोळी, , रमतापूर, कुडली सोमूर, बेम्बरा मानूर, दाबनगौर, मरतोळी, सड़गी बिजलवाडी, कोकलगाव अशा अनेक गावातील शेती पाण्याखाली गेली आहे खानापूर सर्कल, करडखेड सर्कल, मरखेल सर्कल, शहापूर सर्कल, ह्या ठिकाणी 200 मिली मिटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतातील अक्षरशः पिकासहीत माती खरडून गेले आहे. त्याकरीता शासनाने कसल्याच प्रकारची चौकशी न करता. तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून करून सरसकट ५0,000/- नुकसान भरपाई देण्यात यावा. अन्यथा मनसे स्टाईलने नांदेड हैदराबाद हवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येई असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे उपजिल्हा अधिकारी देगलूर यांना देण्यात आले त्यावेळी गजानन वरसमवार (जि. उपाध्यक्ष मनसे नांदेड देगलूर तालुका अध्यक्ष मन्मथ परबते…