
निक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी सेक्रेटरी अॅड.प्रवीणदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहाणगोठीआदिवासीवाडी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट, वह्या आणि खाऊ वाटप करण्यात आला.
सदर कार्यक्रमास अॅड. काजल ठाकूर तसेच श्री प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड ,श्री प्रतीक खारकर आणि इतर मान्यवर पालक ,ग्रामस्थ शिक्षक वृंद उपस्थित होते तसेच खानाव केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय श्री संजय पोईलकर उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट ,वह्या दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद दिसत होता.
श्री प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी सांगितले की अॅड. प्रवीण दादांचा वाढदिवस दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यावर्षी प्रवीण दादा तसेच आमचे भाग्य आहे की या सहाणगोठीआदिवासी वाडी शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना आम्ही छोटीशी मदत रेनकोटच्या स्वरूपात देऊ शकलो .भविष्यातही या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच शाळेला काही गरज भासल्यास आमच्या परीनं पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
अॅड.काजल ठाकूर कार्यक्रम प्रसंगी बोलताना म्हणाल्या “की माझे सासरे स्वर्गीय मधुकर ठाकूर उर्फ आमचे पप्पा यांचे आशीर्वाद आमच्यावर आहेत आणि त्यांची समाजसेवेची पद्धत आम्ही अंगीकारून कृतीत आणण्याचा आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि शाळा सजावट याबद्दल त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री अजित हरवडे सर यांनी केले. शाळेची शाळा व्यवस्थापन समिती,पालक , ग्रामस्थ आणि शिक्षकवृंदाच्यावतीने अॅड.प्रविणदादा आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देण्यात आले.श्री संजय पोईलकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.