
नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव महाराष्ट्राची बुलंद तोफ , मन्याड खोऱ्याचा ढाण्या वाघ , धगधगता ज्वाला , शिक्षण भगीरथ , शिक्षण महर्षी , नाही रे वाल्यांचे कैवारी , सुग्या मुग्याचे दाता , गोरगरिबांचे व दीन दलितांचे आधारस्तंभ , शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते , दर्पण पुरस्कार प्राप्त , श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्थापक संचालक माजी खासदार व आमदार ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत भाई डॉक्टर केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या 59 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला हा गुणगौरव सोहळा ज्युनिअर कॉलेज , माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या वतीने वेगवेगळ्या वेळेत आयोजित करण्यात आला होता. .याप्रसंगी तिन्ही विभागाच्या वतीने कॉलेज , हायस्कूल मधून बारावी व दहावी बोर्ड परीक्षा 2023 मधुन मेडिकल प्रवेशास पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा , जेईई मधून इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे व कॉलेजचे नाव रोशन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा हृदय पूर्ण सत्कार करण्यात आला तसेच बारावी व दहावी बोर्ड परीक्षेतून प्रथम , द्वितीय , तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचे व प्रत्येक विषयातून 100 पैकी 90 च्या वर गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व क्रीडा क्षेत्रात निबंध स्पर्धेत , वादविवाद स्पर्धेत व वक्तृत्व स्पर्धेत प्रथम , द्वितीय , तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन हृदय पूर्ण शाल व श्रीफळासह सत्कार करण्यात आला व प्राथमिक शाळेतून पहिला , दुसरा , तिसरा येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणाानुक्रमे रोख रक्कम देऊन सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. .तसेच कौठा शाखेमध्ये शाखाप्रमुख प्रा. सय्यद जमील यांच्या नेतृत्वात व प्रा. लुंगारे ज्ञानेश्वर प्रा. श्रीवास्तव दीपक प्रा. योगेश दिग्रसकर , प्रा. संगीता स्वामी , प्रा. देशमुख शिवशंकर यांच्या सहकार्यातून कॉलेजच्या प्रशासकीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व शुभ हस्ते मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासह वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला प्रसंगी कौठा शाखेतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. .मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सुधीर कुरुडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थितीत मा.मधुकरराव कुरुडे ( शालेय समिती सदस्य नांदेड ) , मा. सूर्यकांत कावळे ( शालेय समिती सदस्य नांदेड ) , श्रीमती मीराताई कुरुडे ( शालेय समिती सदस्य नांदेड ) मा. इंद्रजीत बुरपल्ले ( शिक्षकेतर – शालेय समिती सदस्य नांदेड ) , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाडेवाले , कौठा विभाग प्राथमिक चे मुख्याध्यापक गवळे नामदेव सर , शाळेचे उपमुख्याध्यापक डी.पी. कदम , पर्यवेक्षक मा. सदानंद नळगे व मा.शिवराज पवळे , ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य मा. डॉ. एम. एन. शिंदे , पर्यवेक्षक प्रा. वसंत राठोड , सांस्कृतिक विभाग प्रमुख ( उ.मा.) – प्रा. स्वाती कान्हेगावकर , माध्यमिक विभाग – डॉ. कविता तीर्थे व प्राथमिक विभाग – शहाजी आहेर प्राथमिकचे पर्यवेक्षक मा.पंढरीनाथ काळे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती . .कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्रथेनुसार वंदे मातरम या गीताने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवानंद मारोतराव सोनटक्के यांनी केले तर बक्षीस वितरणाची धुरा प्रसिद्धी प्रमुख प्रा. कैलास पतंगे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.स्वाती कान्हेगावकर यांनी सांभाळली आणि अतंत: प्रा. जामकर दिपाली यांच्या आभार प्रदर्शना नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली याप्रसंगी श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेज चे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.