
चर्मकार बांधवांना मिळणार तात्काळ कर्ज – आ.बच्चु कडू
चर्मकार समाजाला करण्यात आले आवाहन…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (चांदूरबाजार) :व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे,समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.परंतु त्या समाजकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ जनसामान्य चर्मकार बांधवांपर्यंत पोचविण्याकरता आमदार बच्चु कडू यांनी “समाजकल्याण कार्यालय आपल्या दारी” उपक्रम राबविला आहे.तर कागदांची योग्य पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांना ५० हजाराचे मायक्रो कर्ज तात्काळ मिळणार असे आमदार बच्चु कडू यांनी म्हटले.
चर्मकार बांधवांकरिता ५० हजार ते ५ लाखापर्यंत कर्ज योजना उपलब्ध करून देण्याकरिता पूर्णामाय दिव्यांग पुनर्वसन केंद्र,टोंगलापूर फाटा,कुरळपूर्णा चांदूरबाजार येथे दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ वाजता “समाजकल्याण कार्यालय आपल्या दाराशी” या उपक्रमाचे उद्घाटन आमदार बच्चु कडू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा उपाध्यक्ष रवींद्र राजुस्कर,व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ,विभागीय अधिकारी दिनेश भागवतकर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,अमरावती यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून जिल्हाध्यक्ष निलेश जामठे,जिल्हाध्यक्ष प्रल्हाद आसोले,युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत नाथे,सुरेश गणेशकर,अरुण गोडेकर,अविनाश तायडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत चर्मकार बांधवांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे.