
दै.चालुवार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
उस्मानाबाद: (परंडा) महाराष्ट्र नवनिर्माण सेना परंडा शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की परंडा शहरात ग्रामीण भागातून आठवड्या बाजारात येणाऱ्या महिला व पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता शासकीय कार्यालयात कामासाठी येत असतात या ठिकाणी महिला व पुरुषाना मुतारी नसल्याने लघूशंका करण्याकरिता कायम अडचणीला सामोरे जावे लागते, परंडा शहरात कोणत्याही भागात कुठेही कसल्याही प्रकारची नागरिकासाठी मुतारीची व्यवस्था नसल्यामुळे महिलासह ज्येष्ठ नागरिकांना यामुळे अडचणीस सामोरे जावे लागत आहे.नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेऊन हा संवेदनशील विषय श्रीमती मनीषा वडेपल्ली मुख्याधिकारी नगरपरिषद परांडा यांनी शहरातील व तालुक्यातील नागरिकांचे होणारी गैरसोय दुर करावी, असे निवेदनात म्हटले आहे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेले आहे या निवेदनाची दखल घेऊन हा संवेदनशील विषय तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी केली आहे.अन्यथा याविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, मनसे शहराध्यक्ष नवनाथ कसबे यांनी इशारा दिला आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष श्री आबासाहेब ढवळे साहेब, जिल्हा सरचिटणीस नागेश मोरे, शहराध्यक्ष नवनाथ कसबे, सामाजिक कार्यकर्ते राहुल शंकर बनसोडे परांडा शहर शाखाध्यक्ष अनिल दनाने आदींच्या स्वाक्षरी आहेत.