
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर): देगलूर तालुक्यातील“येरगी गावातील चालुक्यकालीन सांस्कृतिक झरा ” या कॉफी टेबल बुकचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात सम्पन्न झाले. पुरातन ठेवा, इतिहास संशोधक, कला अभ्यासकांना या कॉफी टेबलची उपलब्धता होण्यासाठी व या निर्मितीचे अभिलेखात कायमस्वरूपी संकलन होण्यासाठी
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ,मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल
व जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील चालुक्य कालीन संपदा जतन करण्यासाठी,जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने निर्माण करण्यात आलेले “येरगी चालुक्यकालीन सांस्कृतिक झरा ” या कॉफी टेबल बुकच्या उपलब्धते मुळे देशभरातली अभ्यासकांना एक संदर्भ निर्माण झाला आहे.
परंतू जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक अभ्यासकांना, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथे येणा-या इतिहास अभ्यासकांना हा संदर्भ उपलब्ध व्हावा, या करिता या सोबत “येरगी- चालुक्यकालीन सांस्कृतिक झरा ” या कॉफी टेबल बुकची आपल्या कार्यालयाच्या संदर्भ सुचीमध्ये नोंद घेऊन
अभिलेख शाखेत कायमस्वरुपी अभिलेख श्रेणीत नोंद करावी अशी मागणी येरगी ग्रामपंचायत कार्यालय तर्फे करण्यात आली आहे. याप्रसंगी या संदर्भात निवेदन देताना येरगीचे सरपंच संतोष पाटील,ग्राम विकास अधिकारी राजेश तोटावाड आधी गावकरी उपस्थित होते.