
दै.चालु वार्ता
परंडा प्रतिनीधी धनंजय गोफणे
परंडा –तालुक्यातील भोञा गावाचे प्रतिष्ठात नागरीक दिगंबर यल्लाप्पा पवार वय ८४ वर्षे यांचे १२/०८/२०२३ रोजी वृध्दापकाळाने राहात्या घरी निधन झाले , त्यांच्या मागे पत्नी 2 मुले सुना नातवंडे 3 विवाहित मुली असा परीवार आहे , परंडा शहर व परिसरात आण्णा नावाने परिचित होते . २००७ दशका पर्यंत राजकीय सामाजिक व मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षे उत्कृष्ट कार्य केले . ते रामेश्वर सदगुरू मजुर सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते , ग्रामपंचायत , प.स., जि.प , मजुर फेडरेशन , उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनेक निवडणुकीत त्यांची महत्त्वाची भुमिका ठरली ,
त्यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शोकाकुल वातावरणात दुपारी ११वाजता भोञा येथे अत्यंविधी करण्यात आला त्या वेळी राजकीय, सामाजिक शैक्षणिक विविध संघटनेचे पदाधिकारी नातेवाईक गांवकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
मी वडार महाराष्ट्राचा संघटना उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनिल भाऊ पवार व अनिल पवार यांचे वडील होते…