
तर मराठवाडा सहसंयोजकपदी माधव पांचाळ यांची निवड
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – लोहा तालुक्यात सामाजिक कार्यात सतत चर्चेत असणारे ज्ञानेश्वर प्रेमलवाड यांची भारतीय जनता पार्टीच्या मराठवाडा संयोजक अध्यक्षपदी तर पञकारीता क्षेत्रातसह उद्योजक क्षेत्रांतील लोहा तालुक्यातील नावाजलेले व्यक्तीमत्व ज्ञानेश्वर उर्फ माधव पांचाळ यांची मराठवाडा सहसंयोजक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .
विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात काञज येथील गणेशकाका सोमनाथ जगताप भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभाग ( महाराष्ट्र संयोजक ) यांच्या निवासस्थानी व राजीव शर्मा भारतीय जनता पार्टी ( महाराष्ट्र सहसंयोजक ) यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ज्ञानेश्वर प्रेमलवाड यांची मराठवाडा संयोजकपदी तर माधव पांचाळ यांची मराठवाडा सहसंयोजकपदी निवड करण्यात आली व यावेळी त्याच्या सत्कार व सम्मान करून नियुक्तीपत्र देण्यात आले .
भारतीय जनता पार्टीच्या विविध जबाबदाऱ्या घेऊन पक्ष वाढीसाठी कार्यरत आहात. आपला प्रदिर्घ अनुभव पाहता आपण जनतेच्या प्रगती व कल्याणाकरीता केन्द्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना पक्षाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन अथक परिश्रम कराल व ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल असा विश्वास व्यक्त करुन यावेळी त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर या निवडीबद्दल नांदेड जिल्ह्यासह मराठवाडा विभागातुन त्यांना प्रत्येक अप्रत्यक्ष sms काॅल करून इतरांनी पण शुभेच्छा दिल्या.