
दैनिक चालू वार्ता
हिमायतनगर प्रतिनिधी राम चिंतलवाड
हदगाव -हिमायतनगर मधील सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा – लोकनेते बाबुराव पाटील कोहळीकर
हिमायतनगर तालुक्यामध्ये रुग्णांची सेवा करावी या उदात्त हेतूने हदगाव हिमायतनगर चे लोकप्रिय लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी हिमायतनगर येथील परमेश्वर मंगल कार्यालय येथे भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या सर्व रोग निदान व उपचार शिबिरास तालुक्यातील व परिसरातील गरजू लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहून लाभ घ्यावा असे आवाहन लोकनेते बाबुराव कदम पाटील कोहळीकर यांनी केले आहे.
या शिबिरामध्ये सर्वच रोगांचे निदान करण्यासाठी सुविधा पुरविण्यात येणार असून येथे येणाऱ्या सर्व रुग्णांना मोफत सुविधा पुरविली जाणार आहे. यात रक्तदाब, ब्लड शुगर,बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग,अशक्तपणा, मासिक पाळीचे आजार,पांढरे पाणी जाणे, कॅन्सर संबंधित आजार, हृदयाला छिद्र, मतिमंद मुलाच्या विकासासंबंधी आजार तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार, कान, नाक, घशाचे सर्व आजार, संधिवात, मणक्यात असणाऱ्या वाकलेली फॅक्चर तसेच झाडाचे सर्व आजार,खाज, गचकरण,अंगावरील पांढरे डाग, त्वचेचे विविध आजार,दमा बरेच दिवसाचा खोकला,तोंडावर पडणारे रक्ताचे ठसे, डोळ्याचे आजार, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया, तिरळेपणा इत्यादी सर्व आजारांवर मोफत इलाज होणार आहेत.
तसेच या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान व संदर्भ सेवा देण्यात येईल फाटलेले ओठ दुभंगलेले टाळू तसेच जन्मता असलेल्या मुखविकृतीवर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल. गुडघा व कंबरेच्या सांध्याचे प्रत्यारोपण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आल्यास मोफत करण्यात येईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिलांच्या स्तनाचा कर्करोगाची भरती नंतर मोफत तपासणी करण्यात येईल. तसेच रुग्णाचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत न झाल्यास रुग्णांना औषध स्वतः करावा लागेल.
या सर्व रोग निदान व उपचार शिबिरासाठी तालुका भरातील डॉक्टरसह विशेष डॉक्टरांची टीम बोलवण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय संजय भाऊ राठोड साहेब मृदा व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली चे खासदार माननीय हेमंत भाऊ पाटील, आमदार संतोष राव बांगर कळमनुरी विधानसभा, आनंदरावजी जाधव शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख शिवसेना नांदेड, माननीय अरुणा संगेवार उपविभागीय अधिकारी हदगाव, माननीय भालेराव कल्याणकर आमदार नांदेड उत्तर विधानसभा, माननीय सेपगत आमना उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर, आदित्य शेंडे तहसीलदार तहसील कार्यालय हिमायतनगर, कैलास बळवंत गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर, डॉक्टर संदेश पोहरे तालुका आरोग्य अधिकारी हिमायतनगर, सूर्यकांत ताडेवाड मुख्याधिकारी नगरपंचायत हिमायतनगर, डॉक्टर राजेंद्र वानखेडे तालुकाध्यक्ष डॉक्टर असोसिएशन हिमायतनगर, डॉक्टर डी डी गायकवाड माजी तालुका अधीक्षक ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर, विजय पी चेन्ना तालुका कृषी अधिकारी हिमायतनगर, बी.डी.भूसनूर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिमायतनगर, रामभाऊ ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हिमायतनगर, आशिष भाऊ सकवान तालुका अध्यक्ष भाजपा हिमायतनगर हे उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी हादगाव तालुक्यामध्ये भव्य दिव्य असा सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले होते. यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर उद्या दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी हिमायतनगर येथील परमेश्वर मंगल कार्यालय मध्ये भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिर आयोजित केले आहे.तालुक्यातील सर्व गरीब गरजू लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. यासाठी परिसरातील व तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांनी यासाठी नोंदणी करून सर्व रोग निदान व उपचार शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन हदगांव हिमायतनगरचे लोकप्रिय नेते बाबुराव पाटील कोहळीकर यांनी केले आहे…