
शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – नगराध्यक्षा सौ.मीराताई बोराडे..
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे..
जालना मंठा:- नगरपंचायतच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा सोमवार (ता.१४) रोजी संपन्न होणार असून पालकमंत्री ना.अतुल सावे विशेष निमंत्रित असून विरोधी पक्षनेते ना.अंबादास दानवे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहील. या उद्घाटन सोहळ्याला शहरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ मीराताई बालासाहेब बोराडे यांनी केले आहे. मंठा नगरपंचायतच्या भव्य प्रांगणात आयोजित उद्घाटन सोहळ्याच्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आ.सतीश चव्हाण,आ. विक्रम काळे,आ.राजेश राठोड, आ.बबनराव लोणीकर, नगराध्यक्षा सौ.मीराताई बालासाहेब बोराडे, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,जालनाचे माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ए.जे.पाटील बोराडे, नगरपंचायत उपाध्यक्षा इरमसबा रशीद खाटीक,उपसभापती गोपाळराव बोराडे,प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, प्रसिद्ध गायक व संगीतकार नितीन सरकटे उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी शहर व तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.मीराताई बालासाहेब बोराडे यांच्यासह मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, उपाध्यक्षा इरमसबा रशीद खाटीक, नगरसेवक अचित आनंदराव बोराडे, बाज मोहम्मदखा पठाण, शेख साजिद शेख जलील, सौ.नंदाताई उत्तमराव राठोड, दीपक आसाराम बोराडे, सौ. यमुनाताई शेषनारायण दवणे, सौ. छायाताई अरुण वाघमारे, अशोक रावसाहेब खंदारे, सौ. मीनाताई सचिन बोराडे, खय्युम यासीन बागवान, सौ. वंदनाताई वैजनाथ बोराडे, सौ. सुषमाताई प्रदीप बोराडे, सौ. सरोजाताई प्रल्हादराव बोराडे, सौ. शोभाताई प्रसादराव बोराडे, विकास रेणुकादास सूर्यवंशी यांनी केले आहे.