
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नादेड(देगलूर): राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपाशीर्वादाने बिलोली येथील आनंद गार्डन येथे राज्यस्तरीय सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह दि. ६ ते १३ ऑगस्ट या कालावधीत पार पडला सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या शिवनाम सप्ताह समितीचे अध्यक्ष नागनाथ पाटील माचनूरकर आणि स्वागताध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील सावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 13 ऑगस्ट रोज रविवार बिलोली येथे वसुंधरारत्न राष्ट्रसंत गुरुवर्य सद्गुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपाशीर्वादाने अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण समाप्ती सोहळ्यास गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर, यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला या राज्यस्तरीय सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताहात तेलंगाना कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून वीरशेव लिंगायत बांधव तसेच सर्व धर्मातील हजारो भक्तांनी सतत सात दिवस या सप्त्याचा लाभ घेतला या अखंड शिवनाम सत्याच्या समाप्तीला शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहरराव धोंडे व बिलोली देगलूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रशांत पाटील आचेगावकर महाराष्ट्र उपाध्यक्ष वैजनाथराव तोनसुरे,मराठवाडा प्रमुख विठ्ठलराव ताकबीडे,संभाजी बुडडे,बसापुरे सर,शिवा संघटना देगलूर तालुकाप्रमुख अशोक मजगे,शिवा संघटना देगलूर शहराध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर,महेश हांडे,सदाशिव बोडके,हणमंतराव पाटील व हजारोंच्या संख्येने भावीक भक्त उपस्थित होते…