
सपोनि शिवप्रकाश मुळे यांचे प्रतिपादन…
दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- आजचे जग हे स्पर्धेचे जग आहे , तरुणांनी जीवनात व्यसनापासून दूर राहून समाजात तरुणांनी एक नवीन आदर्श निर्माण करावा.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले , शाहू महाराज , भगवान गौतम बुद्ध , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे , लहुजी वस्ताद साळवे अशा अनेक महामानवाला डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घालून स्वाभिमानी जीवन जगत त्यांचा आदर्श घ्यावा असे मत उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिव प्रकाश मुळे यांनी केले.
उस्माननगर ता.कंधार येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांची १०३ वी जयंती २२ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली.यावेळी सकाळी दहा वाजता सपोनि श्री.शिवप्रकश मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर जाहीर सभेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या प्रथम महिला नागरिक ( सरपंच ) श्रीमती गयाबाई शंकरराव घोरबांड , प्रा.विजय भिसे ( भिमाशंकर माध्यमिक विद्यालय शिराढोण ) ,शिवसांब कोरे ( त्रिमूर्ती मा.विद्यालय मुख्याध्यापक ) पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष – लक्ष्मण कांबळे , लक्ष्मण भिसे ,माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाधर कांबळे , पत्रकार संघाचे उपाध्यक्ष माणिक भिसे , अशोक पा.घोरबांड , पत्रकार तथा सहशिक्षक सुनिल जमदाडे ,ग्रा.पंसदस्या सौ.संगिताबाई वि.भिसे ,सौ.रेखाबाई गंगाधर भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम येथील समाजातील प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते यांच्या वतिने समाजातील ह्या वर्षामध्ये मृत्यू झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा.विजय भिसे ,शिवसांब कोरे , लहान मुलींनी , मुलांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन चारित्र्यावर समयोचित भाषणे केली.
यावेळी सपोनि शिवप्रकाश मुळे म्हणाले की , ज्या गावात कोणत्याही प्रकारे सुविधा नव्हत्या त्या गावात शिक्षणासाठी झगडावे लागत होते त्याच गावात दीड दिवस शाळा शिकून लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक साहित्य ,कथासंग्रह , पोवाडे , तसेच संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि कामगारांच्या लढ्यासाठी आपले आयुष्य झिजविले. व त्यांना संघर्ष करावा लागला ., शिक्षणासाठी समाजाच्या सुधारण्यासाठी समाजाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य झिजवले , परंतु आपण महापुरुषांच्या विचारावर चालतो आहोत का ? झेंडे लावावेत तर शिक्षणाचे ,विचाराचे , प्रगतीचे , महापुरुषांचे विचार डोक्यात घातल्यास इतिहास समजणार आहे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा, भाषण स्पर्धेमधून महापुरुषांचे विचार मुलांना समजले पाहिजेत . सर्वांना महापुरुषांच्या विचारावर चालण्याची गरज आहे. मुलांना चांगले संस्कार द्या . अपल्या मुलांना शिकवा शिक्षणातून तो देशात नाव उंचावर घेऊन जाईल.एका दिवसापूर्ती जयंती साजरी न करता दररोज विचाराची आणि प्रगतीची यशाची तयारी असणे गरजेची आहे. या देशात कित्येक साधू , संत ,महापुरुषांनी दैविक कार्य केले आहे ., माणसं असून सुद्धा देवाला लाजवेल असे कार्य कृती केलेले आहे. तरुणांनो आपल्या आयुष्याचे वाटोळ करून घेऊ नका . गुन्हा कुठे घडत असेल तर तिथे न थांबता सरळ निघून जावे.एक दिवसाची जयंती न करता दररोज महापुरुषांचे विचार मनात बाळगून यशस्वी जीवनाची वाटचाल सुरू ठेवा . महापुरुष हे कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नसून , ते तमाम जनतेचे आहेत .आई-वडिलांनी मुलाच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवावे त्यांच्याशी संवाद साधावा. चुकीच्या वृत्तीपासून स्वतःला सर्वांनी दूर ठेवावे यातच आपले व समाजाचे भले आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. तेव्हा प्रत्येक तरुणांनी , विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून समाजात एक नवीन आदर्श निर्माण करून महामानवाचा आदर्श घ्यावा असे आवाहन सपोनि शिवप्रकाश मुळे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विजय भिसे यांनी तर
सूत्रसंचालन प्रा.ॲड.नागन भिसे यांनी केले. व आभार तेजस भिसे यांनी मानले . तर दुस-या सत्रात दुपारी तीन वाजता पारंपारिक वाद्याच्या निनादात गावातील प्रमुख रस्त्याने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर. अण्णाभाऊ साठे यांच्यातील चित्राची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक संपल्यानंतर सर्वांनाचा आस्वाद घेतला नंतर रात्री दहा वाजता गितमोह सांस्कृतिक कलामंच शिराढोण संचलित शाहीर बापराव जमदाडे व त्याचा संच,आणि गायीका सुनिताजी परभणीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला व पुरुषांनी गायनाचा आस्वद घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी रूपेश भिसे ,आनंदा भिसे ,देवानंद भिसे , गंगाधर भिसे , अमोल भिसे , दिनेश भिसे , यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.