
दैनिक चालू वार्ता
किनवट प्रतिनिधी दशरथ आंबेकर
चालू रेल्वेत चढण्याचा प्रयत्नांत गंभीर जखमी युवकाला आदीलाबाद येथून नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाल्याने किनवट शहर व तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळी ८:४० वाजता आदिलाबाद- नांदेड इंटरसिटी किनवट रेल्वे स्थानकावरून नांदेड जाण्यासाठी निघाली असता महेश कनाके २५ वर्षीय युवक रा. भोईगल्ली किनवट हा चालू गाडीत चढत असतांना त्यांनी दरवाज्याच्या बाजूचे दोन रॉड पडले परंतु त्याचा पाय घसरला अन रेल्वे गाडी व प्लॉट फॉर्म च्या मध्ये दोन्ही पाय गेल्याने
काही अंतरापर्यंत तो फरफटत गेला परंतु प्रवाशांनी सदरील घटना पाहताच गाडीची चैन ओढली व आरडाओरडा केला त्यामुळे चालकाने गाडी थांबवली येथील युवकांनी त्यांला ताबडतोब बाहेर काढले व किनवट गोकुदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे रेफर करण्यात आले होते. दोन्हीपाय आत गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यास आदिलाबाद येथे उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील हॉस्पिटलला रेफर करण्यात आले होते. परंतु वाटेतच हिंगणघाट जवळ त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी किनवट येथे समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.