
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (कंधार):- मौ सिरसी बु. परीसरात ता कंधार येथे एप्रिल २०२३ च्या शेवटच्या आठवडयात गारपिट व अतिवृष्टी होवुन शेतक-यांच्या पिकाचे व फळबागाचे खुप मोठे नुकसान झाले होते.नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले कृषि अधिकारी व तलाठी यांनी एकाच ठिकाणी बसुन पंचनामे केले. त्यामुळे खरे शेतकरी गारपिट व अतिवृष्टीच्या लाभापासुन वंचीत राहीले आहेत.
तरी मा साहेबांनी तलाठी व कृषि अधिकारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी व नुकसानग्रस्त शेतक-यांना न्याय द्यावा अन्यथा मंडळातील सर्व शेतक-यांच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल यांची नोंद घ्यावी असे निवेदन व्यंकटी जाधव, संग्राम गायकवाड, मारोती जाधव, गोविंद जाधव,लोकडोबा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे मागणी केली आहे…