
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- पोलीस प्रशासन जे उत्सवाच्या दिवशी सुद्धा जनतेच्या सेवेत रुजू असते. नेहमी सर्व जनतेच्या रक्षणार्थ आपली सेवा जवाबदारीने पार पाडते.अशा पोलीस प्रशासनात काही पोलीस अधिकारी हे बाहेर गावचे असतात ते शहरात जनतेच्या सेवेत रुजू असतात त्यामुळे ते उत्सवाच्या दिवशी सुद्धा आपल्या गावाकडे जाऊ शकत नाहीत. रक्षाबंधना सारख्या उत्सवाच्या दिवशी ते बहिणी कडून राखी सुद्धा बांधून घेऊ शकत नाहीत हे सर्व लक्षात घेऊन त्यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करने हे दरवर्षी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गावहिनी कार्यकर्ते करत असतात.ह्या वर्षी सुद्धा रक्षाबंधन उत्सवाच्या दिवशी प्रत्येक पोलीस स्टेशन ला भेट देऊन तेथील पोलीस बांधवाना राखी बांधून विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गावहिनी कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन उत्सव साजरा केला. भाग्यनगर पोलीस स्टेशन, शिवाजी नगर पोलीस स्टेशन,एस पी ऑफिस,हनुमान पेठ पोलीस स्टेशन, इतवारा पोलीस स्टेशन येथे भेट देऊन रक्षाबंधन हा उत्सव साजरा करण्यात आला.