
दैनिक चालु वार्ता
म्हसळा रायगड प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव,आंतर राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष -2023 आणि पोषण महिना 2023 या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक वाचनालय म्हसळा सभागृहात करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांचे हस्ते करण्यात आले. त्यांनी आयोजीत रान भाज्यांच्या व पाक कलेच्या स्टॉलना भेटी देऊन सविस्तर माहिती घेत रानभाज्या आणि त्यांचे आहारातील महत्त्व या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.याच कार्यक्रमचे अनुषंगाने मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नव नियुक्त मिनी अंगणवाडी सेविका व पाच मदतनीस यांना नियुक्ती पत्र देवुन शुभेच्छा दिल्या तसेच महीला व बाल विकास प्रकल्प योजने अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत मौजे पाष्टी येथिल अंशिका सतिश लाड आणि चीचोंडे येथील मनीषा पवार याना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे मुदत ठेव प्रमाण पत्र देवुन त्यांना सन्मानित करण्यात आले. शेती विषयक कार्यक्रमाचे मार्गदर्शक सलमा नाजिरी यांनी रानभाज्यांचा उपयोग आणि आहारातील महत्त्व या विषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.महेश बोराडे यांनी गटशेती या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांचे हस्ते तालुक्यातील आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला या वेळी त्यांचे समावेत उपविभागीय अधिकारी संदिपान सानप,जिल्हा कार्यक्रम अधिकारी कुचिक मॅडम,कृषी उपसंचालक शिवाजी भांडवलकर,कृषी उपसंचालक बोराडे,तहसीलदार समीर घारे,पोलिस निरीक्षक संदीपान सोनावणे,गटविकास अधिकारी श्री भोगे,तालुका कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे,माजी कृषी सभापती बबन मनवे,नगराध्यक्ष असहल कादिरी,उपनगरध्यक्ष संजय दिवेकर,माजी सभापती महादेव पाटील,माजी उपसभापती संदीप चाचले, तालुकाध्यक्ष समीर बनकर,प्रगतशील शेतकरी संतोष(नाना)सावंत,जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,माजी सभापती नाजिम हसवारे,बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली कळबासकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जाधवसर यांनी प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक सुजय कुसळकर यांनी तर आभार कृषी पर्यवेक्षक रामेश्वर मगर यांनी मानले.कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन कृषी सहायक गणेश देवडे, धनंजय सरनाईक,अशोक सानप आणि समस्त कृषी विभाग कर्मचारी आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांचे मार्फत करण्यात आले होते.