दैनिक चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी गजानन ठोके
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या आंदोलनासाठी जाणाऱ्या समाज बांधवांवर केलेल्या लाठी चार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ पैठण सह तालुक्यातील प्रत्येक गावात रविवार दिनांक3 सप्टेंबर रोजी बंदची हाक मराठा क्रांती मोर्चा तर्फे देण्यात आली होती यास प्रतिसाद देत पैठण तालुक्यातील प्रत्येक गावात कडकडीत बंद पाळण्यात आला पैठण तालुक्यातील पैठण शहरासह प्रत्येक गावातील व्यापारी बंधूंनी आपापली दुकाने बंद ठेवून तालुका बंदला प्रतिसाद दिला
पैठण तालुक्यातील विहामांडवा पाचोड आडुळ बिडकीन बालानगर राजापूर ही प्रमुख मोठी गावे व येथील बाजारपेठा बंद ठेवून सर्वांनी या बंदला प्रतिसाद दिला दरम्यान रविवारी भरणारा पाचोड येथील आठवडी बाजार बंद असल्याने येथे होणारी लाखोची उलाढाल झाली नाही या पैठण बंदला प्रतिसाद म्हणून तालुक्यातील प्रत्येक गावांनी आपापली गावे बंद ठेवून अंतरवाली येथील घटनेचा निषेध केला यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता…
Related Stories
7 hours ago
