
दैनिक चालु वार्ता
वैजापूर ता.प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर(छत्रपती संभाजीनगर)-वैजापूर तालूक्यात पावसाने ४५ दिवसांची दडी मारली आहेत परिणामी खरीप हंगामातील कापूस, मका, सोयाबीन,भुईमुग, मुग ही पीकं आता कोमात गेल्याच सर्वत्रच दिसत आहे. त्यामुळं कर्ज काढून शेती करणारा बळीराजा या हंगामात चांगल्याच अडचणीत सापडला आहे व शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण होत असल्याचं दिसून येत आहे वैजापूर तालुक्याची वाटचाल दुष्काळाच्या दिशेने सूरू झाली आहे तालुक्यात गेल्या तीन महिन्यांतील पावसाची सरासरी पाहता तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे पावसाळ्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे दुष्काळ् जाहीर करण्यासाठी तालुक्यात पीक कापणी प्रयोग,आणेवारी या सर्व सोपस्कारातून पुढे जावे लागणार आहे. तोपर्यत कागदी घोडे नाचविण्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान पावसाच्या उघडीपीच्या पार्श्भूमीवर महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्यांकडून सर्वेक्षण करण्यात येऊन यात तालुक्यातील वैजापूरसह शिऊर, गारज,महालगाव, नागमठाण, बाबतारा, खंडाळा, बोरसर, जानेफळ व घायगाव मंडळात पावसाने उघडीप देऊन 41 दिवसांचा कालावधी उलटला आहे.त्यामुळे या मंडळातील शेतकर्यांना पीकविमा म्हणून 25 टक्के अग्रीम देण्याच्या निकषात ते बसू शकतात
फक्त ई पिक पाहणी केली म्हणजे पिकविमा भेटल तसे नाही त्यानंतर शेतकऱ्यांना परत विमा कंपनी कडे claim करावे लागते विमा कंपनी ला आपल्या पिकाचे झालेले नुकसान दाखावे लागते त्या नंतरच आपला पिक विमा मंजुर होतो..