दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- उस्माननगर येथील महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री गोविंदराव भिसे यांचे कनिष्ठ बंधू व त्याच्या परिवारातील श्री.सदाशिव शेषराव भिसे यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा ‘राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
उस्माननगर ता.कंधार येथील भिसे परिवारातील चारही बंधू अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन शासकीय वेगवेगळ्या सेवेत दाखल झाले होते यापैकी सर्व ज्येष्ठ श्री.शिवाजी शेषराव भिसे (स. आरोग्य अधिकारी)श्री.शंकर सदाशिव भिसे (हिवताप अधिकारी) श्री. गोविंद शेषराव भिसे (वरिष्ठ तंत्रज्ञ) व श्री. सदाशिव शेषराव भिसे (शिक्षण विस्तार अधिकारी) या सर्व बंधूंनी अत्यंत हलकीच्या परिस्थितीवर मात करत. शिक्षणाच्या तळमळीने आपल्या कुटुंबाचे नाव गावच्या स्म्रतीपटलावर आणले आहे. श्री.सदाशिव भिसे यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण पिपल्स हायस्कूल इथून पूर्ण करून शासकीय अध्यापक विद्यालय हदगाव येथून डी.एड. पूर्ण केले. त्यानंतर त्यांची प्रथम नेमणूक १८ जून १९८६ रोजी हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सरसम येथे सहशिक्षक म्हणून झाली. सरसम परिसरात ‘विद्यार्थी प्रिय’ भिसे सर म्हणून त्या पंचक्रोशी आजही ओळखले जातात.तेथील त्यांचा सेवाकाळ अत्यंत प्रामाणिकपणे घालवून नावलौकिकस मिळवला. सरसम येथे त्यांनी वीस वर्ष अत्यंत चोक पणे सेवा बजावली.यानंतर सेवेच्या पुढील काळात पदोन्नतीमध्ये फेब्रुवारी २००८ मध्ये त्यांना ‘केंद्रप्रमुख’ म्हणून तालुका हिमायतनगर येथील विविध केंद्रावर शासकीय सेवा दिली. हिमायतनगर तालुक्यात काम करताना त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व शाळांवर वरिष्ठ स्तरावरील त्यांची कामे अत्यंत जबाबदारपणे केल्याने सर्वपरिचित केंद्रप्रमुख म्हणून त्यांची ओळख होती. यानंतर किनवट तालुक्यातील बेल्लोरी(धा) केंद्रामध्ये सात वर्ष सेवा दिली. बेल्लोरी(धा) केंद्रात काम करत असताना शिक्षकांचे वेगवेगळे प्रशिक्षणे, बैठका घेऊन शासनाच्या वेगवेगळ्या शालेय योजनांचे, उपक्रमाचे मार्गदर्शन केले. यानंतर त्यांना याच तालुक्यातील खांबाळा केंद्राचे केंद्रप्रमुख जबाबदारी दिली. या केंद्राचे काम करताना त्यांनी आपल्या वक्तशीरपणाने व कर्तव्यदकक्षतेन सर्व शिक्षकसह व वरिष्ठ अधिकाऱ्यां मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय काम केले. यानंतर तालुकास्तरीय बदलीत त्यांना ता.मुदखेड येथील निवघा केंद्र देण्यात आले. या केंद्रातील जवळपास १७ आधिनस्त शाळांचे वेगवेगळे अहवाल, बैठका, शासकीय उपक्रम, शिष्यवृत्ती परीक्षा, निवडणुका या सर्व कामकाजामध्ये अत्यंत चोखपणे व जबाबदारीने काम करून मुदखेड तालुक्यात आपल्या शालेय प्रशासकीय कार्याचा ठसा उमटविला. शासकीय स्तरावर जवळपास ३६ वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांना काल ३१ऑगस्ट २०२३ रोजी पंचायत समिती मुदखेड यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन बारड च्या ‘शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा’ पदभार देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला.
सदाशिव भिसे हे डिसेंबर २०२३ ला आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या या सेवाकाळात त्यांनी केलेल्या अत्यंत प्रामाणिक, जबाबदार व कर्तव्यदक्ष सेवेची दखल घेऊन महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेने त्यांना ‘राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार’ देऊन अगदी सार्थोचीत सत्कार केला आहे.
आपली सेवेची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी त्यांची दोन मुले व एक मुलीला उच्च शिक्षित करून आपले पालकत्व सिद्ध केले आहे. त्यांचा मोठा मुलगा सुशील हा ( बँक मॅनेजर, मुंबई) असून लहान मुलगा सौरभ हा (इलेक्ट्रिक ऑपरेटर) आहे. त्यांच्या विवाहित मुलीचे ही (एम.ए.बी.एड.) उच्च शिक्षण झाले आहे. याचबरोबर सदाशिव भिसे सरांनी समाज उपयोगी अनेक विविध कार्यक्रमांमध्ये आपला आर्थिक,शारीरिक वाटा देऊन समाजऋणाचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. श्री.सदाशिव भिसे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल व ‘शिक्षण विस्तार अधिकारी’ पदाच्या यशस्वी कारकीर्दीसाठी शिक्षण अधिकारी, शिक्षक वर्ग, त्याच्या परिवाराकडून, इष्ट मित्राकडून व उस्माननगर गावातील नागरिकांकडून या सर्वाकडून अनंत शुभेच्छा.
