
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:- जालना जिल्ह्यातील अंतरवाली (सराटी) गावात मनोज जरांडे पाटिल यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन सुरू असताना मराठा आंदोलकांवर स्थानिक पोलीस प्रशासनाने १ सप्टेंबर रोजी अमानुषपणे लाठीचार्ज केला, शांततेत असणाऱ्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जमध्ये मराठा समाजाच्या महिला,पुरुष व लहान बालके गंभीररित्या जखमी झाले आहेत, ही बाब निषेधार्ह आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आज दि.४/०९/२०२३ रोजी धनंज (बु.), वाका, जोमेगाव,
उमरा, धनंज(खु.),वजिरगाव, कहाळा(खु.)(बु.), कौठा फाटा नांदेड हैद्राबाद रस्त्यावर सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने निषेध करण्यात आला.