
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- नांदेड जिल्हातील सर्व तालुक्यात व प्रत्येक गावागावात जालना जिल्हातील अंतरवाली (सराटी) येथे मराठा साम्राज्याला धक्का देत ज्या प्रमाणे रामदेव बाबा यांचे आंदोलन मागील सरकारने दडपण्याचा प्रकार झाला होता. त्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषण सुरू होते. उपोषणकर्ते मुख्यमंत्री यांच्या फोन ला नकार दिल्याने आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. त्यांच्या निषेधार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच कंधार, लोहा, मुखेड, नायगाव, नर्सी, धर्माबाद, बिलोली, देगलूर, उमरी, किनवट, भोकर, माहुर, अर्धापूर, हिमायतनगर येथील शहर व ग्रामीण भागातील मराठा समाजातील तरूण, माता, भगिनी, लहान मुले, जेष्ठ नागरिक समाजबांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.