दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि 04 सप्टें पिंपळे गुरव कासारवाडी (पुणे )
कासारवाडी येथील भारतरत्न जे .आर.डी. टाटा उड्डाणपुलाच्या खालून नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे आणि बांधकाम व्यवसायिकांनी प्रदूषित केलेली परंतु पालिकेकडून आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्षित राहीलेली पवना नदी काळवंडलेल्या दूषित पाण्यासह वाहत असते, पुलावरून जातांना येताना नागरिक कचरा वरुन फेकतात त्यातील काही कचरा पुलाच्या खालच्या बाजूच्या फटीमध्ये अडकलेला असतो त्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात तर आलेच आहे शिवाय नागरिकांचे पण आरोग्य धोक्यात कालांतराने येणार आहे.अनेक वेळा तरुणाई त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला सेल्फी फोटो काढण्यात मग्न असतात अशा वेळी तोल जाऊन खाली पडून दुर्घटना घडू शकतात.
पालिकेने ज्याप्रमाणे औंध मधून वाहत जाणाऱ्या मुळा नदीवरील पुलावर संरक्षक जाळ्या खूप उंचीवर बसवलेल्या आहेत त्याच धर्तीवर जे.आर.डी टाटा उड्डाण पुलाखालून वाहणाऱ्या पावनामाई साठी नदीच्या कमीत कमी तेवढ्या परिसरात तरी आणि काळेवाडी कडे जाणारा लिंक रोडवर रागा पँलेसजवळील वाहणाऱ्या पवना नदीच्या भिंतीच्या वरती कमीत कमी जाळ्या बसवाव्यात अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
निवेदनावर शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, शहराध्यक्षा मीना करंजवणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, सचिव गजानन धाराशिवकर, मुरलीधर दळवी यांच्या सहया आहेत.
