
नांदेड देगलूर: सप्तगिरी पोदार लर्न स्कूल देगलूर या शाळेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिक्षक दिन’ व ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती हर्षोल्हासात साजरा करण्यात आली.
शिक्षकदिनाचे औचीत्य साधून सकाळच्या परीपाठात शिक्षकांनी भाग घेऊन प्रार्थना, नवीन शब्द, सुविचार, सामान्य ज्ञान वरील आधारीत प्रश्न हे सर्व प्रत्यक्ष शिक्षकांनी पूर्ण केले. त्यानंतर शाळेतील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनात प्रत्यक्ष सहभागी होऊन अध्येयन व अध्यापनचे कार्य उत्साहाने पार पाडले. यात एक दिवसाचे प्राचार्य सिध्देश देशपांडे, उपप्राचार्य गणेश काळे हे विद्यार्थी होते. यातून विद्यार्थ्यांनी अध्यापनाचा अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
शिक्षक दिनाचे औचीत्य साधून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांसाठी वेगवेगळे खेळ जसे संगीत
खुर्ची, चित्रफित ओळखणे, रॅम्प वॉक इत्यादी खेळाचे आयोजन करून सर्व शिक्षकांना शॉल व श्रीफळ देऊन सन्मानीत
करण्यात आले..
या कार्यक्रमासाठी शाळेचे संचालक श्री डॉ. कपील एकलारे सर यांनी उपस्थित राहून शिक्षक दिनाच्या सर्वांना
शुभेच्छा देऊन सर्व शिक्षकांना भेट वस्तू देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच सांस्कृतीक विभाग प्रमुख शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचारी यां सर्वांचे कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान लाभले होते.