
दै.चालु वार्ता
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
जालना:-सरकारकडून अद्याप कुठलाही निरोप आला नाही. आमची लढाई सुरू आहे आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहे. शांततेत लढाईचे व्यापक स्वरूप होईल आम्ही सरकारची चर्चा करायला तयार आहोत .मंत्रालयात जाण्यासाठी पिशव्या भरून ठेवल्यात. परंतु निरोप अजून येत नाही .आम्ही 2 पाऊले मागे येतोय. माझ्या शब्दावर मी ठाम आहे. जर सरकारने पुढे काही केले नाही तर पाणी त्याग आणि उपचार बंद होतील असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे…
मराठा समाजातील आंदोलनात यश येण्याचे शक्यता अधिक आहे मराठा समाजाने आंदोलन करा पाठिंबा वाढवा परंतु कुठल्याही आंदोलनात गालबोट लागणार नाही याचीही काळजी घ्या मराठा समाजातील तरुणांनी कोणीही टोकचे पाऊल उचलू नाही. आत्महत्या सारखा प्रकार करू नये .आम्ही येथे तुम्हाला न्याय देण्याची जीवाची बाजी लावलेली आहे जर तुम्ही असा काही पाऊल उचलले तर आम्ही ही पाऊल कोणासाठी उचललाय तर आम्ही ही लढाई कोणासाठी उभारली असे सवाल त्यांनी उपस्थित केले…
त्याचसोबत आरक्षणाचा फायदा प्रत्येक मराठा समाजातील मुलांना होणार आहे यापुढे काळातील आत्महत्यांचा प्रकार करू नये माझ्यावर विश्वास ठेवा उग्र आंदोलन करून नये आत्महत्या करू नये कुणावरही गुन्हा दाखल होऊ नये शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करावा ही माझी सर्वांना विनंती आहे .तरीही कुणी तोड फोड करत असेल तर ते आमच्या कार्यकर्त्यांनाहीत मराठा समाजाचा नाही .वाशिम सारख्या ठिकाणी आजही बंद आहेत बीडमध्ये चक्काजाम झाले आहे. आंदोलन शांततेत व्हायला हवे कायदा सुव्यवस्था बिघडेल असे. कृत्य करू नये मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोहोचवावे न्याय मिळणार आहे वाढता पाठिंबा ठेवा आंदोलन लोकशाही मार्गाने करा असे आवाहन मनोज जरांगे यांनी केला…