
सरपंच व उपसरपंच यांच्या गैरहजारीत उरकली ग्रामसभा…
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर):
तालुक्यातील देगाव (बु ) च्या ग्रामसेवकांनी सरपंच व उपसरपंच यांच्या गैरहजेरीत सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी ग्रामसभा उरकून अजब कारभाराचा उत्तम नमुना दाखवायला आहे. या बाबीची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी करावी अशी मागणी येथील ग्रामस्थातून केली जात आहे.
कोणतीही ग्रामसभा घेत असताना गाव पुढार्यांना तसेच गाव कारभाऱ्यांना पूर्वी कल्पना देणे गरजेचे असते किंवा तशी नोटीस ग्रामपंचायत कार्यालयाला लावली जाते असे शासकीय अध्यादेश आहे. असे असतानाही देगावचे ग्रामसेवक वामन बिरादार यांनी गाव कारभाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता सोमवारी ग्रामसभा उरकून वरिष्ठ अधिकाऱ्यापुढे आपण कर्तव्य बजावण्यात किती तत्पर असल्याचा आव आणण्याचा केविलवाणी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सोमवारी जालना लाठीच्या झाल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा कडकडीत बंद होता. या बंद दरम्यान देगाव गावातील सर्व समाजाचे तरुण देगलूरच्या आंदोलनात सहभागी झाले होते नेमकी हीच संधी साधून आपण आजपर्यंत विविध योजनेच्या निधीवर डल्ला मारण्याचे उघड होऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप केला असल्याचे चर्चा आहे.
___________
महिला सरपंच नामधारी अन
पतीची लुडबुड लय भारी..
प्रत्येक क्षेत्रात महिलांना 50 टक्के आरक्षण दिले आहे ज्या त्या क्षेत्रात तूर्त घडीला महिला पूर्णतः सक्षम असतानाही महिला सरपंच अर्थात पत्नी सरपंच झाली की पत्नीला पूर्ण अधिकार न देता पतीची कायमची लुडबुड लई भारी ठरत आहे. ही वस्तुस्थिती एका देगावपूर्तीच नसून संबंध जिल्ह्यासह राज्यातही अशी विदारक परिस्थिती दिसून येत आहे. शासकीय अध्यादेशात सरपंच महिलेच्या कारभारात पतीची लुडबुड नको असे असतानाही या नियमास धाब्यावर ठेवून पतीची हेराफेरी कायम असते. अशा लुडबुड धारक पति वर फौजदारी गुन्हा दाखल करावी अशी मागणी पुढे येत आहे.
देगावच्या ग्रामसेवकावर काय कारवाई होणार ?
–
शासकीय नियमास तिलांजली देत ग्रामसभा उरकणाऱ्या देगावच्या ग्रामसेवकावर काय कारवाई होणार याकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे मागील प्रमाणे या अधिकाऱ्यास वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालतील की कारवाई करतील हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..