
दै.चालु वार्ता
चिखलदरा प्रतिनिधी वासुदेव पाथरे
अमरावती (चिखलदरा) : चिखलदरा तालुक्यातील बिहाली गावातील रहिवासी सौ.सरस्वती शेलूकर यांचे राहते घर अतिवृष्टीच्या पावसामुळे ८ सप्टेंबर २०२३ रोजी कोसळले.
सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सरस्वती ताई ह्या स्वयंपाक करून काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या.तर त्यांचे पती मुलीला घेऊन बाहेर गेले होते.पावसाच्या थैमानाने अचानक सरस्वती ताईचे घर कोसळले आणि घरात असलेले घरगुती संपूर्ण सामानाचे नुकसान झाले.त्यामध्ये अलमारी पलंग कपडे असे संसार उपयोगी साहित्य धुळीस मिळाले.घर कोसळल्यामुळे आता शेलुकर कुटुंबियांवर राहण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाकडून पंचनामा करण्यात आला असून त्या गरीब कुटुंबीयांना शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावे.तसेच त्या गरीब कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक पाठबळ द्यावे असे परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे.