
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : बहुजन हिताय बहुजन सुखाय*! हे ब्रीद वाक्य असलेल्या व आदर्श शिक्षण संस्था म्हणून महाराष्ट्र शासनाने गौरव केलेल्या
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री भैरवनाथ विद्यालय करडे विद्यालयात संस्था वर्धापन दिन विद्यालयाचे प्राचार्य मा.अजिनाथ ओगले सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी कै. बाबुरावजी घोलप साहेब व सहकार महर्षी कै.मामासाहेब मोहोळ यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्था वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रकाश प्रवहन सत्र घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. विद्यालयातील विद्यार्थी समृद्धी जाधव, साईरुद्र गायकवाड, सोनल गायकवाड यांनी घोलप साहेबांच्या विचारांचे स्मरण जीवनपट, या विषयी माहिती सांगितली. शिक्षक भाषणामधील श्री बखाल किरण यांनी स्वतःचे अनुभव व संस्थेचा इतिहास सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अजिनाथ ओगले यांनी संस्थेच्या संदर्भात येणारे अनुभव व संस्था विकासासाठी केलेले कार्य या विषयी माहिती दिली तसेच सर्व विद्यार्थ्यांना संस्था वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले व सूत्रसंचालन सौ लोखंडे मंदा व समीर गिरमकर सर यांनी केले व कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार सौ पवार वर्षा यांनी मानले.