
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :– मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत या मागणी साठी जालना येथे चालु असलेल्या उपोषणास जाहीर पाठिंबा देत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मागील ६ दिवसापासून नांदेड जिल्हातील विविध गावात आमरण उपोषण चालु आहेत, सदरील उपोषण कर्त्यांची कुठलीही हाणी झाल्यास त्याला सर्वस्वी राज्य शासन जबाबदार राहील.सकल मराठा समाज,नांदेड जिल्हातील विविध ठिकाणचे उपोषण कर्ते१)दत्ता पाटील हडसनिक स्थळ:हडसनी ता.हदगाव उपोषणकर्ते शासकीय रुग्णालय नांदेड येथे आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची तब्बेत खालवलेली आहे. २)सतिश पाटील हिप्परगेकर३)गजानन पाटील हिप्परगेकर स्थळ : तहसील कार्यालय, नायगाव.दोन्ही उपोषणकर्त्यांची तब्बेत खालवलेली आहे. ४)हनुमंत बालाजी ढगे स्थळ: हनुमान मंदिर,वजीरगाव ता.नायगाव
५)संभाजी पाटील गोंधळे-वय ६५ वर्ष ६)नामदेव पाटील डावकोरे -वय ३६ वर्ष ,स्थळ:ग्राम पंचायत कार्यालय,पेठवडज ता.कंधार
उपोषण कर्त्यांच्या वयाचा विचार करून जाग्यावर सलाईन चालु,करण्यात आली आहे तब्बेत अतिशय नाजुक आहे.पेठवडज येथे पोलीस प्रशासनाचा उपोषणकर्ते यांच्यावर प्रचंड दबाव आहे. ७)आकाश पाटील कल्याणकर स्थळ: तहसील कार्यालय,कंधार८)जयवंत कदम
९)स्वप्नील कदम१०)संतोष कदम
११)आकाश शिंदे स्थळ ग्रामपंचायत कार्यालय,धामदरी ता.अर्धापूर उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावलेली आहे.
१२)कुरुंदा गावातील सर्व समाज बांधव स्थळ : स्मशानभूमी, कुरुंदा ता. वसमत
१३)आज दि.९/९/२३रोजी डेरला गावातील संपूर्ण गावकरी आपल्या कुटुंबासहित एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करीत आहेत.स्थळ:जिल्हा परिषद शाळा, डेरला ता.लोहा तसेच १४)ग्रामपंचायत कार्यालय काटकळंबा ता. कंधार यांनी मराठा आरक्षण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. आणि १५)हाळदा येथील शहाजी पाटील शिंदे हे दि.१०/९/२३ रोज रविवारी ग्रामपंचायत कार्यालय हाळदा ता. कंधार येथे उपोषणाला बसले आहेत.या सर्व उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावलेली आहे. काही बरेवाईट झाल्यावर सर्व जबाबदारी शासनावर राहिल त्यामुळे शासनाने मराठ्यांच्या मागण्या मान्य करून सर्व सरसकट मराठा समाजाला ओबिसी प्रवर्गातून आरक्षण लागू करावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.तसेच काही बरेवाईट झाल्यास राज्य शासन जिम्मेदार राहिल असे सकल मराठा समाज नांदेड जिल्हाच्या वतीने कळविले आहे.