
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (नायगाव):- मागील तीस वर्षापासून प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा प्रश्न कुठल्याही सरकारने आजपर्यंत निकाली काढला नाही म्हणून मराठा समाजाने अनेक वेळा वेगवेगळे आंदोलने केली,आणि सरकारने वेळोवेळी समाजाचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न केला आणि घातक असे गुन्हे दाखल केले, आमच्या न्यायिक मागण्यासाठी संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आम्हां मराठ्यांना नाही का…?या देशात लोकशाही जिवंत आहे का ? असा संतप्त सवाल मराठा समाज यांनी निवेदनाच्या माध्यमातून सरकारला विचारलाय.मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न निकाली काढून मगच त्यांनी राज्यभर दौरे करावेत अन्यथा त्यांना जागोजागी मराठा बांधवाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा जळजळीत इशारा नायगाव तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्धा निकाली निघणार नाही तोपर्यंत नायगाव तालुक्यात कोणतेही राजकीय कार्यक्रम घेवू नये आणि दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी पूर्ण नायगाव बंदचे आवाहन करण्यात आले.या बंदच्या मागण्या खालील प्रमाण आहेत:
१) जालना जिल्हयातील मराठा आंदोलकांवर करण्यात आलेला अमानुष लाठीचार्ज या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी.
२) मौ.अंतरवाली जिल्हा जालना येथील पोलिसांनी हल्ला करून त्यांच्यावरच घातक असे गुन्हे दाखल केलेले आहेत,ते गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना संरक्षण देण्यात यावे.
३) मा.राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटी सोडुन उर्वरित गायकवाड आयोगाच्या शिफारशी विचारात घेत मराठा आरक्षणाचा टाईम बॉण्ड देण्यात यावा. अन्यथा मराठवाड्यातील मराठा समाजाला शासन निर्णयानुसार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत.अशी मागणी सकल मराठा समाज नायगाव यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे.